Celebrate the divine feminine
Witness unmatched fervour and reverence as devotees celebrate the enchanting Hindu festival of Navratri. ‘Nav’ stands for nine, and ‘ratri’ means night, signifying the nine vibrant nights where devotees pay homage to various incarnations of Goddess Durga. Navratri is not just a festival, it’s a profound spiritual journey and a dazzling cultural spectacle for millions of devotees in India.
भक्त नवरात्रीचा मोहक हिंदू सण साजरा करत असताना अतुलनीय उत्साह आणि आदर पहा. ‘नव’ म्हणजे नऊ, आणि ‘रात्री’ म्हणजे रात्र, ज्या नऊ चैतन्यमय रात्री दर्शवतात जिथे भक्त दुर्गा देवीच्या विविध अवतारांना वंदन करतात. नवरात्री हा केवळ एक सण नाही तर भारतातील लाखो भाविकांसाठी हा एक गहन आध्यात्मिक प्रवास आणि एक चमकदार सांस्कृतिक देखावा आहे.
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठीं झळके माळ मुक्ताफळांची॥०१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रें मनकामना पुरती ।।ध्रु।।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुगुट शोभतो बरा
रुणझुणती नुपुरें चरणी घागरिया ॥जय .॥॥०२॥
जय देव जय देव ...
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावें निर्वानीं रक्षावें सुरवंदना ।
जय देव जय देव ...
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥०३॥
लवथवती विक्राळा
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥
दुर्गे दुर्घट भारी
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
जय देवी जय देवी
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
जय देवी जय देवी
आरती विठ्ठलाची
वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा ।
पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥
तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी
कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥२॥
जय देव जय देव जय
धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥
जय देव जय देव जय
ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिण्ड्या पताका वैष्णव नाचती
पण्ढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥
जय देव जय देव जय
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती ।
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥
जय देव जय देव जय
ज्ञानराजा आरती
महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत ।
मनु वेधला माझा ।
आरती ज्ञानराजा ।।धृ०।।
लोपलें ज्ञान जगीं ।
हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग ।।
नाम ठेविलें ज्ञानी ।। १ ।।
आरती ज्ञानराजा ।।धृ०।।
कनकाचे ताट करीं ।
उभ्या गोपिका नारी ।
नारद तुंबरही ।।
साम गायन करी ।। २ ।।
आरती ज्ञानराजा ।।धृ०।।
प्रगट गुह्य बोले ।
विश्व ब्रह्याचे केलें ।
रामा जनार्दनी ।।
पायीं मस्तक ठेविलें ।। ३ ।।
आरती ज्ञानराजा ।।धृ०।।
नाना परिमळ गणपती आरती
लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।
ऎसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।
अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती ।।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावती अंती भवसागर तरती ।। २ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।
शरणांगत सर्वस्वें भजती तव चरणी ।
कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणि ।।
त्रैलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणी ।। ३ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।
घालीन लोटांगण वंदीन चरण
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन ।
भावे ओवाळिन म्हणे नामा ।
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव ।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।
बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै ।
नारायणायेती समर्पयामि ।
अच्युतं केशवं राम नारायणम्
कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
जानकीनायकं रामचंद्र भजे ।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृ्ष्ण कृ्ष्ण हरे हरे ।
। मंगलमुर्ती मोरया । । गणपतिबाप्पा मोरया ।
मंत्रपुष्पांजली मंत्र
ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ।
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय ।
महाराजाय नम: ।
ॐ स्वस्ति।
साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं
तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति
तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो
मरूतस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।।
एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।
तन्नोदंती प्रचोदयात् ।
मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।। ।।गणपतिबाप्पा मोरया ।।
श्री दत्तांची आरती
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥
जय देव जय देव जय
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥
जय देव जय देव जय
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥
जय देव जय देव जय
श्री कृष्णाची आरती
चरणकमल ज्याचे ति सुकुमार । ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर
।। ओवाळू।।1।।
नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान । हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान
।। ओवाळू।।2।।
मुखकमल पाहता सुखिचिया कोटी । वेधले मानस हारपली दृष्टी
।। ओवाळू।।3।।
जडित मुगट ज्याचा देदीप्यमान । तेणे कोंदले अवघे त्रिभुवन
।। ओवाळू।।4।।
एका जनार्दनी देखियले रूप । पाहता जाहले अवघे तद्रूप
।ओवाळू।।5।।
दुर्गे दुर्घट भारी
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
जय देवी जय देवी
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
जय देवी जय देवी
नवरात्री आरती
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र - जप करुनी भोवत रक्षक ठेवुनी हो
ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो || १ ||
द्वितीयेचे दिवशी मिळती चौषष्ठ योगिनी हो
सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो
उदो:कार गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो || २ ||
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो
कणकेचे पदके कासे पितांबर पिवळा हो
अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो || ३ ||
चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो
उपासका पाहसी माते प्रसन्न अंत:करणी हो
पूर्णकृपे जगन्माते पाहसी मनमोहनी हो
भक्तांच्या माउली सूर ते येती लोटांगणी हो || ४ ||
पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो
अर्ध पाद्य पूजेने तुजला भवानी स्तवती हो
रात्रीचे समयी करती जागरण हरीकथा हो
आनंदे प्रेम ते आले सद् भावे ते ऋता हो || ५ ||
षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो
घेउनि दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो
जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो || ६ ||
सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो
तेथे तु नांदशी भोवती पुष्पे नानापरी हो
जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडता झेलुन घेशी वरचेवरी हो || ७ ||
अष्टमीचे दिवशी अंबा अष्टभुजा नारायणी हो
सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगद्जननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो
स्तनपान देउनि सुखी केले अंत:करणी हो || ८ ||
नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो
सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो
षडरस अन्ने नेवैद्याशी अर्पियली भोजनी हो
आचार्य ब्राह्मणा तृप्तता केले कृपे करुनी हो || ९ ||
दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो
सिंहारूढ करि सबल शश्त्रे ती घेउनी हो
शुंभनीशुंभादीक राक्षसा किती मारसी राणी हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो || १० ||
जीवदानी माता आरती(new)
प्रसन्न होसी तू अंबे सुखदाता ॥ धृ ॥
शैलशिखरी गडावर वास तुझा माते ।
भक्तांचे संकट हरण्या धावून येसी तू जाते ॥
जय देवी जय देवी जीवदानी माता... ॥ १ ॥
भाली कुंकुम शोभे विशाल नयन दोन ।
रत्नजडित मुकुट शिरी उजळे रूप छान ॥
जय देवी जय देवी जीवदानी माता... ॥ २ ॥
हाती पंकज घेऊनी त्रिशूल सान्निध्दी ।
भक्तांलागी पावे तू माता कृपाळू बुद्धी ॥
जय देवी जय देवी जीवदानी माता... ॥ ३ ॥
नवरात्रीच्या उत्सवी जनसागर उसळे ।
दर्शनमात्रे भक्तांचे कष्ट सकल टळे ॥
जय देवी जय देवी जीवदानी माता... ॥ ४ ॥
जीवदानी माता आरती
आरती भक्त ही गाती तव नामस्मरणी ॥
जय जय माँ जीवदानी ॥ धृ ॥
पंचामृत अभिषेके कांती तव विलसे ।
गंधित फुलमालांनी प्रसन्न मुख झळके ॥
जय जय माँ जीवदानी ॥ १ ॥
हिरवे, रक्तिम, पिवळे वस्त्र तुला साजे ।
कृपानिधीगे माते नाम भुवनी गाजे ॥
जय जय माँ जीवदानी ॥ २ ॥
भाली कुंकुम शोभे विशाल नयनद्वय ।
रत्नजडित शिरी मुकूट उजळीतसे भाल ॥
जय जय माँ जीवदानी ॥ ३ ॥
हाती पंकज रक्तिम सान्निध्दी त्रिशूल ।
कठोर घेशी परीक्षा कुसुमापरी मृदुल ॥
जय जय माँ जीवदानी ॥ ४ ॥
जीवनधन शैलशिखरी होऊनी निवासिनी ।
भक्तांचे दुःख हरण्या झालीस वनवासिनी ॥
जय जय माँ जीवदानी ॥ ५ ॥
दर्शनमात्रे तुझिया सकल हरती दुःखे ।
उच्चारिता तव नाम भक्तां सुख लाभे ॥
जय जय माँ जीवदानी ॥ ६ ॥
नवरात्रीच्या उत्सवी जनसागर उसळे ।
शोभा किती वर्णावी भक्त धन्य झाले ॥
जय जय माँ जीवदानी ॥ ७ ॥
पुन्हा पुन्हा मन धावे घेण्या शुभदर्शन ।
शुभांगिनी जीवदानी सार्थक हो जीवन ॥
जय जय माँ जीवदानी ॥ ८ ॥
माते, दे अखेरीस एकची वरदान ।
दीनदुबळ्यांची सेवा करण्या दे त्राण ॥
जय जय माँ जीवदानी ॥ ९ ॥
लोलो लागला अंबेचा
प्रपंच खोटा हा, मृगपाणी घोरे फिरतो प्राणी। कन्या-सुत-दारा-धन माझे मिथ्या वदतो वाणी। अंती नेतील हे यमदुत। न ये संगे कोणी।
निर्गुण रेणुका कुळदेवी जपतो मी निर्वाणी ।। लोलो।।१।।
पंचभूतांचा अधिकार केलासे सत्वर। नयनी देखिला आकार। अवघा तो ईश्वर। नाही सुख – दुःख देहाला कैचा अहंकार। पाहे परमात्मा तो
ध्यानी भासे शून्याकार ।। लोलो।।२।।
ध्याता मुद्रा ही उन्मनी लागे अनुसंधानी। निद्रा लागली अभिध्यानी जें का निरंजनी। लीला वर्णिता स्वरूपाची शिणली शेशवाणी।
देखिला भवानी जननी त्रैलोक्यपावनी ।। लोलो।।३।।
गोंधळ घालील मी अंबेचा घोष अनुहाताचा। दिवट्या उजळूनिया सदोदित पोत चैतन्याचा। आहं सोहं से उदो उदो बोलली चारी वाचा।
।। लोलो।।४।।
पाहता मूळपीठ पर्वत सकळामध्ये श्रेष्ठ जेथ जगदंबा अवधूत। दोघे भोपे भट। जेथे मोवाळे विंजाळे प्रणीता पाणी लोट।
तेथे तानाजी देशमुख झाला ब्रम्हनिष्ठ ।। लोलो।।।।५।।
श्री रेणुका माता आरती
अनुपम स्वरुपाची तुझी धाटी | अन्य नसे या सृष्टी ||
तुज सम रूप दुसरे, परमेष्टी | करिता झाला कष्टी ||
शशीरस रसरसला ,वदनपुटी | दिव्य सुलोचन दृष्टी ||
सुवर्ण रत्नांच्या, शिरी मुकुटी | लोपती रविशशी कोटी ||
गजमुखी तुज स्तविले हेरंबे | मंगल सकळारंभे || जय जय || १ ||
कुमकुम चिरी शोभे मळवटी | कस्तुरी टिळक लल्लाटी ||
नासिक अति सरळ, हनुवटी | रुचिरामृत रस ओठी ||
समान जणू लवल्या, धनुकोटी | आकर्ण लोचन भ्रुकुटी ||
शिरी नीट भांगवळी, उफराटी | कर्नाटकची घाटी ||
भुजंग नीळरंगा, परी शोभे | वेणी पाठीवर लोंबे || जय जय || २ ||
कंकणे कनकाची मनगटी | दिव्य मुद्या दश बोटी ||
बाजूबंद जडे बाहुबटी | चर्चुनी केशर उटी | सुगंधी पुष्पांचे हार कंठी ||
बहु मोत्यांची दाटी | अंगी नवी चोळी, जरीकाठी | पीत पितांबर तगटी ||
पैंजण पदकमळी, अति शोभे | भ्रमर धावती लोभे || जय जय ||३ ||
साक्षप तू क्षितिच्या तळवटी | तूचि स्वये जगजेठी ||
ओवाळीत आरती, दिपताटी | घेऊनी कर संपुष्टी ||
करुणामृत हृदये, संकटी | धावसी भक्तांसाठी | विष्णूदास सदा, बहुकष्टी | देशील जरी नीजभेटी ||
तरी मग काय उणे, या लाभे | धाव पाव अविलंबे || जय जय || ४ ||